February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.31) – श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पू.) ता.गंगापूर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे होते. तर प्रमुख पाहुणे शालेय समितीचे सदस्य सोमीनाथ हिवाळे, गावातील प्रतिष्ठित नागरिक भागवत देशमुख, शिवाजी गवाले, मारुती चव्हाण, माधव फाजगे, मोरे मामा, पर्यवेक्षिका सुरोज पवार, गणेश गिरी, विजयसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

यावेळी शाळेचा मुख्यध्वजारोहण मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांच्या हस्ते करण्यात आला. झेंडावंदन नंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कवायती तसेच देशभक्तीवर गितांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी अनेक मुला मुलींनी देशभक्तिपर गीत गायन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सुलताने, भगवान वनारसे, सुरेश घोरबांड, शिवकुमार होनराव, संतोष बंडेवार, दादासाहेब हजारे, रमा आडे, सविता गोसावी, आशा साळुंके, ज्योती भालेराव, सतिश जावळे, तारामती जाधव यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भांड तर वैशाली सपकाळ यांनी आभार मानले.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *