
वाळुज महानगर – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्या मंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलच्या सहावीतील तुषार खोडके, आयुष गोटे, सार्थक कांबळे, ओमकार म्हैसमाळे, अमित कीर्तीकर, आशितोष पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावरील डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश संपादित केले.
या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय जी जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक हनुमान जाधव, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक रेखा बिदरकर, भाऊसाहेब शिरसाठ तसेच शाळेतील शिक्षक अशोक तारडे, परमेश्वर गीते, विशाल जाधव, पूजा गिरी, शुभांगी नेरपगार, तृप्ती लकडे, दिपाली आहेर, अनिता पंजावाले, मीनल सूर्यवंशी, सोनी शुक्ला आदीची उपस्थिती होती.
