
वाळूजमहानगर, (ता.22) – कन्नड येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत श्री गजानन विद्या मंदिरचे विद्यार्थी कु.वैष्णवी जाधव, गणपत तांबारे, अरफात शेख, आर्यन ओंकार, सम्राट वायवळ, आदित्य राठोड तर बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आयुष पांडे या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल व ट्रॉफी मिळवत शाळेचे नाव लौकिक केले.
या विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष आय जी जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, शाळेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हस्नाजी शिनगारे, मीरा देशपांडे, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक बी व्ही शिरसाठ, रेखा बिदरकर, तसेच संजय तुपे, दीपक कोळी, नीलिमा रेळेकर, पूजा गीरी, दीपक पठारे यांच्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कराटेचे प्रशिक्षक राहुल दोंदे यांनी स्वागत केले.
