वाळूज महानगर – वाळुज येथील कलानगर येथे श्री गजानन महाराज मंदिरात गणेशाची दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा व विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करून श्री गजानन महाराज गणपती मंडळाच्या वतीने शुक्रवारी (ता.9) सप्टेंबर रोजी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून गणरायाला निरोप देण्यात आला.
वाळुज येथील कलानगर मधील श्री गजानन महाराज मंदिरात गणपती उत्सवानिमित्त प्रथमच गणरायाची स्थापना
करण्यात आली होती. यानिमित्त मंदिर परिसरात दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.9) सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनानंतर गणरायाची मोठ्या भक्ती भावाने ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गजानन महाराज मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक रामराई येथील धरणापर्यंत गेली. तेथे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आरती करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. असा जयघोष करण्यात आला. या प्रसंगी श्री गजानन महाराज मंदिर समितीचे आर के भराड, गणेश जगताप, रामदास वाघ, महेश पदार, योगेश चिमखडे, ज्ञानेश्वर आळंजकर, राजू आळंदकर, महेंद्र बोराडे, दत्तु इले, रुस्तुम शेवाळे, नामदेव मोरे, अनंदा वाघ, हरी गोरे,आप्पा शेवाळे, राजू फटांगडे, पांडुरंग राऊत, सोमनाथ राऊत, राजेंद्र शिंदे, नंदू क्षीरसागर, तुषार थोरात, सागर भराड, गौरव शिंदे, शुभम मोरे, विठ्ठल शेवाळे, ओमकार राऊत, समर्थ मोरे आदींची उपस्थिती होती.
………….