
लिंबे जळगाव, (ता.13) : विश्वमाऊली, जगद आधार श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव येत्या 15 आगष्ट रोजी साजरा होत आहे. या श्री क्षेत्र सावखेडा येथील वैष्णव आश्रमात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे.
माऊलींच्या या जन्मोत्सवास 750 वर्षे पुर्ण होत आहे. त्या निमित्त गोकुळाष्टमीचे औचित्य साधून श्री क्षेत्र सावखेडा येथील वैष्णव आश्रमात हभप श्री प्रेममुर्ती नारायणानंदगीरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 9 आगष्ट शनिवार पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असंख्य भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. या साधनेची सांगता शनिवारी 16 श्रावण शुद्ध नवमीला होणार असून भाविकांनी श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
