March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.18) – शेतीच्या बांधावरून शेख आणि खान यांच्यात झालेल्या वादानंतर शेतात असलेला जनावराचा चारा जाळून अंदाजे 45 ते 50 हजार रुपयांचे नुकसान केले. ही अत्यंत खळबळ जनक घटना साजापूर येथे बुधवारी (ता.17) रोजी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेख सुलतान शेख रुस्तुम यांची साजापुर येथील गट नं. 64 मध्ये शेती असुन जमीनीकरिता ये जा करण्यासाठी 15 फुटाचा सामाईक रस्ता आहे. या रस्त्यावरुन ते पुर्वीपासून जा करतात. गट नं. 65 मधील वसीम हुसेन शेख रा. बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर याने शेख सुलतान यांच्या जमीनीकडे ये जा करण्यासाठी असलेला रस्ता सुमारे दोन महीन्यापुर्वी बंद केला. त्याबाबत गट नं. 64 मधील सय्यद नजीर व सुलतान यांच्या भावांनी यापुर्वी त्याबाबत दिवसात तक्रारी अर्ज दिलेला आहे. बुधवारी (ता.17) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुलतान हे शेतीकडे जात असताना गट नं. 69 मधील जुबेर खान अकबर खान रा. साजापुर व इम्रान खान हे ट्रॅक्टरने त्यांचे शेत नांगरताना दोघांच्या शेतामधील सामाईक रस्ता नांगरुन बंद केला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सुमारे 3 वाजेच्या सुमारास लाला भाई यांनी सुलतान शेख यांना फोनद्वारे कळविले की, तुमच्या गोठ्याजवळ आग लागली आहे तुम्ही लवकर या त्यावरुन तेथे जाऊन पाहिले असता शेतातील जनावरासाठी असलेला चारा जळत होता. यात अंदाजे 40 ते 45 हजार रुपयांचा चारा जळून खाक झाला. म्हणुन जवळच असलेले जुबेर व इम्रान यांना विचाले असता त्याने धमकी देत म्हणाले की आता फक्त चारा जाळला आहे, माझ्या नादाला लागाल तर तुम्हाला सुध्दा जाळुन टाकीन. अशी धमकी दिली.
याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *