March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.23)- शेतातील पिकाला पाणी भरत असताना 33 वर्षीय शेत मालकाला मजुराच्या मुलाने व त्याच्या मित्राने लोखंडी गजाने व हाताचापताने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (ता .21 ( रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास शिवराई शिवारात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र हरिभाऊ नेव्हाल (वय 33) यांची शिवराई शिवार येथे शेत गट न. 80 येथे 12 एकर शेती आहे. त्यांच्या शेतात टॅक्टर चालक म्हणुन संजय गोरखनाथ साबळे रा. शिवराई हा एक वर्षापासुन काम करतो. रविवारी (ता.21) रोजी रात्री 9:30 वाजेच्या रवींद्र नेव्हाल व सोबतचा मजुर तांबोरे हे शेतात पाणी भरण्याचे काम करत असताना संजय गोरखनाथ साबळे याचा मुलगा अनिल संजय साबळे व त्याचा मित्र सतीश नंदु घेरे असे दोघे आले. यावेळी अनिल साबळे याने तु माझ्या वडीलांना शेतात कामासाठी बोलवुन दारु का पाजवतोस. असे म्हणाला. यावर तुझ्या वडीलांना मी दारु पाजत नाही, दुसरेच कोणीतरी असेल. तु खात्री करुन घे, मग मला बोल. असे समजावुन सांगत असतांना अनिल साबळे व त्याचा मित्र सतीश घेरे यांनी मिळुन रवींद्रच्या शर्टची कॉलर धरुन तुझे नाटक खुप झाले, आज तुला आम्ही सोडणार नाही. अशी धमकी देत हाताचापटाने मारहाण करत जमीनीवर खाली पाडुन लाथाबुक्याने मारहाण केली. व अनिल साबळे याने लोखंडी सळईने डोक्यात मारुन जखमी केले. याप्रकरणी रवींद्र हरिभाऊ नेवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार किरण जाधव करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *