March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त योगीनी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपुर येथे बुधवारी ( ता.14) रोजी शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते फराळ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या किर्तनाला. मोठ्या प्रमाणावर भाविक-भक्तगण उपस्थि होते. या ठिकाणी तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी शिवसेना पक्षाचे कार्य आणि समाजा प्रति शिवसेनेची असलेली भावना व्यक्त केली. ऐंशी टक्के समाज कारणाचे कार्य शिवसेना कधीही विसरणार नाही. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, उपतालुकाप्रमुख गणेश नवले, सुभाष साबळे, विष्णु जाधव, सचिन गरड, सुदाम भंडे, कृउबा संचालक महेंद्र खोतकर, उपसरपंच कपिद्र पेरे पाटील, मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विजय सरकटे, विष्णु झळके, विभागप्रमुख गणेश सूर्यवंशी, लखन सलामपूरे, दत्तात्रय वर्पे, उपविभागप्रमुख दीपक कानडे, मचिंद्र झळके तात्या, शाखाप्रमुख प्रवीण चंदन, शिवाजी झळके, प्रवीण मुनोत, अब्बास शेख, नितीन कानडे, नितीन गोसावी, राजु दानवे, रामभाऊ हुंबरे, शहादेव फुंदे, लक्ष्मण वाघमारे, नामदेव सगडे, अभिमन्यु ढाकणे, त्रंबक जगताप, सुभाष सावंत, संजय भराड, भरत थटवले, मंदिर विश्वस्त अप्पासाहेब झळके, हरीश साबळे, दिगंबर साबळे, देशमुख काका उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *