वाळूजमहानगर – शिवाजीनगर वाळूज येथील दत्त कॉलनीत यावर्षी प्रथमच शिवनंदिनी नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करण्यात येऊन नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात देवी समोर घटस्थापना करून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात देवीची पूजा, होम हवन यासह दररोज गरबा नृत्य व दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुशिवर्ता साबळे, सविता चौधरी, सारिका वाळूजकर, सविता औताडे, अर्चना कडू, सुरेखा पाटील, पल्लवी शेळके, विजया बनसोडे, वनिता आमटे, ज्योती खजाने, वैशाली बोडखे, शितल बोडखे, संगीता भादे, रेणुका बोडखे, मंगलबाई टाके आदी प्रयत्नशील आहेत.