February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – शिवतेज विद्यामंदिर कमळापूर व संस्कार प्रबोधिनी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी युवा उद्योजक राजू गोरे यांच्या हस्ते धजारोहन कऱण्यात आले. याप्रसंगी नागेश कुकलारे, अजिनाथ मातेरे, अनिता महाले यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्योती नरवडे यांनी भूषवले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले. विविधतेतून एकता, स्वच्छतेचा जागर याविषयी पथनाट्य सादरीकरण केले. लेझिम, घुंगुरकाठी, डंबेल्स, सारी ड्रिलचेेही प्रात्यक्षिक सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हिवाळे यांनी, प्रास्तविक अजिनाथ मातेरे यांनी तर आभार सीमा रणदिवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *