February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.12) – बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयात राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवक दिन) निमित्त सोमवारी 12 जानेवारी रोजी शाळेतील विद्यार्थी राजमाता जिजाबाई, स्वामी विवेकानंद, किरण बेदी, डॉक्टर, वकील, एअर पायलट, उद्योजक आदीच्या वेशभूषेत येऊन राष्ट्रप्रेम, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता संबंधी प्रखर विचार विद्यार्थ्यांसमोर प्रस्तूत केले.


प्रथम शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांच्या हस्ते व्दिप प्रज्वलन व राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. रामकृष्ण मिशन आश्रम, छत्रपती संभाजीनगर येथे 3 डिसेंबर बुधवार रोजी पाठांतर (पठण) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर व परिसरातील जवळपास 160 शाळा व त्या शाळेतील जवळपास 3 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत शिवछत्रपती विद्यालयातील 20 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्या पैकी 10 विद्यार्थांनी घवघवीत यश मिळविले. त्यांना रामकृष्ण मिशण आश्रमच्या वतीने ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला. सर्वात जास्त ट्रॉफी शिवछत्रपती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविल्याबद्दल शाळेला 160 शाळेमधून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक “ढाल” देऊन सन्मानित करण्यात आले.


शिवछत्रपती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या भोसले यांनी पारितोषिक (ट्रॉफी) मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच वेषभुषा परिधान करून आलेल्या विद्यार्थांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले. राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही प्रेरक प्रसंग आपल्या भाषणाव्दारे व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरीत केले. या कार्यकमाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षिका राजमाने मॅडम व शिंदे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांचे सहकार्य लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *