
महानगर, (ता.18) – शिवछत्रपती विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी बाळगोपाळांच्या वेशभूषेत आले होते. त्यामुळे शाळेचे प्रांगण कृष्णमय झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या संजय भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भोसले यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णच्या जीवनातील शिकवणीबद्दल मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधा यांची वेशभूषा करून नृत्य सादर केले.

त्यानंतर, दहीहंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम झाला. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “गोविंदा आला रे आला!” असा जल्लोष केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या जयघोष यातच विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून जल्लोष केला. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत गोविंदाचा उत्साह वाढवला.
कार्यक्रमच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व आनंदमय होण्यासाठी अश्विनी करंजे, सारिका डोंगरे, अर्चना भगत, वनिता शिंदे, आशा करपे यांनी परिश्रम घेतले.
