
वाळूजमहानगर – महाराष्ट राज्य कौशल्य विकास विभाग तर्फे देशपातळीवर शिकाऊ उमेदवार भरती मेळव्याचे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी (ता.17) औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजन करण्यात आले आहे. या करीता सोमवारी वाळूज येथील मसिआ कार्यलयात बैठक घेण्यात आली.
यावेळी उद्योजकता विभागाचे स्वीय सचिव आशुतोष घोरपडे, रमाकांत कणसे, मसिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, भगवान राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी घोरपेडे व कणसे यांनी या भरती मेळाव्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. 12 वी, पॉलिटेक्निक, एमसीव्हीसी च्या उतीर्ण विद्यार्थीना विविध कंपन्या मध्ये संधी मिळणार आहे.

हा मेळवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे सकाळी 10 वाजेपासुन सुरु होणार आहे. या भरती मेळाव्यात दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. या मेळाव्यामध्ये मसीआच्या सभासद कंपन्यांना या भरतीसाठी आपले प्रतिनिधी पाठवण्याचे तसेच या मेळाव्यात जास्तीत जास्त उद्योजक सदस्यांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन मासिआचे अध्यक्ष किरण जगताप आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. या बैठकीसाठी भगवान राऊत, सचिव राजेंद्र देशमुख, सहसचिव अभिषेक मोदाणी, कोषाध्यक्ष सुरेश खिल्लारे, प्रल्हाद गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले, उद्योग संवादचे संपादक श्रीराम शिंदे, सर्जेराव साळुंके, सदस्य अर्जुन गायकवाड, गजानन देशमुख, शरद चोपडे यांची उपस्थिती होती.