
वाळूजमहानगर, (ता.17)- बजाजनगर येथील राजर्षी शाहूनगर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बजाजनगर येथील शिवसेना (शिंदे गट) विभागप्रमुख राजन सोमासे व वडगाव (को.) -बजाजनगरच्या ग्रामपंचायत सदस्य माधुरी सोमासे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वर्षाराणी सानप, कल्पेश सुरडकर, साक्षी सुरडकर, संस्कृती गायकवाड, सुनिता सूर्यतळ मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
