February 5, 2026

राजवीर जाधवची शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

वाळूज महानगर, ता.5) – विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये ज्ञानभवन इंग्लिश स्कूल बजाजनगरचा राजवीर कैलास जाधव याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे राजवीर जाधव याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर 2025 रोजी विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटात ज्ञानभवन इंग्लिश स्कूल बजाजनगरचा राजवीर कैलास जाधव यांनी सहभाग नोंदविला होता. या गटामध्ये राजवीर जाधव याने प्रथम क्रमांक मिळवून शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.                                                         उद्योजक तथा शिक्षण महर्षी हनुमान भोंडवे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी राम मायंदे, रेखा परदेशी, गणेश पाळवदे, सदानंद सावळे, वैभव पवार तसेच ज्ञानभवन इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल शारदा बडे यांनी या खेळाडूचे स्वागत केले. या खेळाडूला राष्ट्रीय पंच अशोक जंगमे, भीमराज रहाणे यांचे मार्गदर्शन लाभले असून विभागीय स्पर्धेसाठी राजवीर जाधव याची निवड झाल्याने त्याला शुभेच्छा दिल्या आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *