March 27, 2026

 


वाळूज महानगर, (ता.19) – शहीद भगतसिंह हायस्कूल बजाजनगर येथे वाळूज एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन डाके व दामिनी पथकाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना मौलिक समुपदेशपर मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी मुख्याध्यापक गौतम शिंदे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वाळूज एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन डाके, दामिनी पथकाच्या निंभोरे मॅडम, कल्पना खरात, नागरे मॅडम, थोटे मॅडम व तडवी तसेच कराटे प्रशिक्षक रामेश्वर चायल हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रथम थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीमती निंभोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशपर मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या वाईट अनुभव लपवून न ठेवता प्रथम आई-वडिलांना शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक यांना सांगाव्या. तसेच कोणत्याही प्रकारचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्यास 112 या क्रमांकावर संपर्क करावा.


तर उपनिरीक्षक सचिन डाके यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रकृतीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. आपली स्वप्न व ध्येय मोठी ठेवावीत या ध्येयाच्या दिशेने आपण पाठलाग करावा. व्यायाम व ज्ञान या दोन्ही बाबी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्ञान घेऊन आपल्या आई-वडिलांची ओळख समाजात निर्माण करावी योग्य आहार विहाराकडे लक्ष द्यावे. अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची वाहने चालवू नये.
तसेच याप्रसंगी श्रीमती नागरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हा बद्दल सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी कल्पना खरात यांनी सांगितले की, मुला-मुलींनी समाजातील वाईट गोष्टीबद्दल जागृत राहून प्रतिकार करायला शिकले पाहिजे. आई वडील यांना आपले सर्वश्रेष्ठ मित्र मानून आपण त्यांच्यासोबत सुसंवाद साधला पाहिजे. व भविष्यातील आपण एक चांगले नागरिक व्हावे असे आवाहन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींना रामेश्वर चायाल यांनी कराटे प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना शाळेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व शिक्षक यांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे व आपल्या शाळेचे, आई-वडिलांचे नाव उज्वल करावे. कार्यक्रम प्रसंगी महादेव लाखे, वैभव ढेपे, रोहिणी पवार, भरत बोडखे, शहाजी भुकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, हरिश्चंद्र गवळी, आतिश डोईफोडे, आशिष मात्रे, सुनीता साक्रूडकर, ज्योती बाणेदार, सुनील बर्डे, विनोद म्हस्के, राहुल साबळे, शैलेंद्र रसाळ, भाऊसाहेब कोळी आदी शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आर. बी.चोपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *