February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.10 – बजाजनगर येथील शहीद भगतसिंह विद्यालयात शहीद भगतसिंह हायस्कूल, शहीद भगतसिंह प्राथमिक शाळा व शहीद भगतसिंह इंग्रजी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.3) जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्याचा अविष्कार करून आपले कलागुण व कौशल्य सर्वांसमोर सादर केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर होते. तर उद्घाटक म्हणून एम.जी.एम.युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ आर्टचे डॉ. योगिता तळेकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सरचिटणीस दामोदर मानकापे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सदस्या रेखाताई भवलकर, कामगार नेते अजय भवलकर, शहीद भगतसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे, शहीद भगतसिंह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख व शहीद भगतसिंह इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अनामिका गोरे, रोहिणी पवार, राजश्री पाटील हे मान्यवर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंह, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत ऍड.उद्धव भवलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितिन देशमुख यांनी केले.

याप्रसंगी डॉ. योगिता तळेकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक जीवनाविषयी व कलागुणाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य करून रसिकांचे मने जिंकली यामध्ये भक्ती गीते, पोवाडा, लावणी, कोळी नृत्य, दक्षिण भारत नृत्य,पंजाबी नृत्य, सामाजिक संदेश देणारे नृत्य सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव ढेपे यांनी तर आभार राजेंद्र मघाडे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *