
वाळुज महानगर, (ता.20)- रांजणगाव (शे. पु.) येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून इयत्ता बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन सोमवारी (ता.19) फेब्रू. 2024 रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भरती साळुंके यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापदाधिकारी अक्षय हरकळ, जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य मनीषा सोनवणे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख यांची उपास्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहर अर्पण करून शिवारती करण्यात आली.
तदनंतर न्यू शहीद भगतसिंह विद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक फेरीचे आयोजन करून महारांची आरती करण्यात करण्यात आली. यावेळी सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी महाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवण आणि भविष्याचा विचार या विषयी मनोगते व्यक्त केली. कार्यकमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष आहेर यांनी तर आभार रोहिमल यांनी मानले.
