February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.7) – जुन्या पडीत विहीरी दुचाकीसह पडल्याने एका 40 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाl. ही घटना कासोडा शिवारात रविवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास उडघकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तुर्काबाद (खराडी ) येथील सुभान शबीर पठाण वय 40 या शेतकऱ्याचे कासोडा शिवारात शेत असून रविवारी 7 डिसेंबर रोजी ते पडीत विहीरी जवळील मोटर चालु करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विहीरीच्या शेजारी दुचाकी उभा करतांना तोल गेल्याने दुचाकीसह विहीरीत पडले. हा प्रकार पाहताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. त्यामुळे बाबासाहेब गिरबाने, बाळु देवबोने, लक्ष्मन गिरबोने, सय्यद अदनान, शेख इम्रान यांच्यासह आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत त्यास दोरीच्या सहय्याने बाहेर काढले. त्यास बेशुध्द अवस्थेत घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून सुभान पठाण यास मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *