* शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार *

वाळुज महानगर, (ता.1) – वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर मधील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये 25 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या 14 वर्षे वयोगटातील शालेय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. हा कबड्डीचा थरार पाहण्यासाठी तालुक्यातील क्रीडा प्रेमींची मोठी संख्या उपस्थित होती. 
या कबड्डी स्पर्धेत पी.एम.ज्ञानमंदिर रांजणगाव प्रथम क्रमांक, स्व. भैरवाल तनवाणी माध्यमिक विद्यालय बजाजनगर द्वितीय क्रमांक, लिटल एंजल स्कूल बजाजनगर तृतीय क्रमांक मिळवला असून प्रथम येणारा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व विस्डम इंग्लिश स्कूल बजाजनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 14 वर्षे मुले कबड्डी स्पर्धेत गंगापूर तालुक्यातून एकूण 30 संघांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. संस्थेच्या संचालिका इश्रत बेग यांनी खेळाडूंना क्रीडा विषयी मार्गदर्शन केले. व विजयी संघांना मेडल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबर बेग, शाळेचे डायरेक्टर अजगर बेग, संस्थेच्या संचालिका इश्रत बेग, राष्ट्रीय खेळाडू कबड्डी बीएसएफचे कोषाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, गंगापूर तालुका क्रीडा संयोजक शेख शफी, डी.पवार, समाधान हराळ, ज्ञानेश्वर सावंत, अजित जाधव, रामेश्वर वैद्य, प्रा.नारायण शिंदे, ओमप्रकाश वाघमारे, योगेश गांगर्डे आदी उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेचे पंच म्हणून शिवराज किरकंडे, आकाश इंगळे, साईराज तांदळे, करण लहाने, प्रशांत भांड, ऋषिकेश ठाकरे, गौरव पवार, कलाभूषण कलावंत यांनी काम पाहीले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. कैलास जाधव व बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक मंडळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
