वाळूज महानगर (ता.7) :- शिवाजीनगर, वाळूज येथील जागृत हनुमान मंदिरात महाआरती, महाप्रसाद व भव्य मिरवणूक. अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन हनुमान जन्मोत्सव गुरुवारी (ता.6) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी “बजरंग बली की जय” असा जय घोष करत काढण्यात आलेल्या भव्य शोभायातेतील सजीव देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.
सकाळची महाआरती उद्योजक रावसाहेब कळमकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जागृत हनुमान संस्थानचे लक्ष्मण पाठे, संजय काजळे, साईनाथ वाघचौरे, सोमनाथ झिंजुर्डे, नंदकुमार वाघुडे, भगवान वाळुंज, करतारसिंग पवार (सर),भगवान पाटील (सर), संतोष सोनवणे, सुरेश केरे पाटील, बापूसाहेब गवते, बाजीराव निरगुडे, सुनील कराळे, रामदास सुडके, विठ्ठल आकारगे, दौलत उगले आदींची उपस्थिती होती.
यावेळी जय बजरंग मित्रमंडळ व हिंदू रक्षक दलाच्या वतीने महाप्रसाद व भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादानंतर अमोल धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शिवाजीनगर, वाळूज परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर कलानगर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवशक्ती कॉलनी, समता कॉलनी, श्रीराम मंदिर, दत्त मंदिर दत्त कॉलनी, गणपती मंदिर अविनाश कॉलनी, श्रीराम कॉलनी, रामराई टी पाँईंट मार्गे हनुमान मंदिर या भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील बजरंग बली, शंकर भगवान, चार दैत्य व अन्य अशा अकरा जणांच्या संचाच्या सजीव देखाव्यांनी अनेकांचे लक्ष वेधले होते.
यावेळी युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रमेश अरगडे, माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, उपसरपंच योगेश आरगडे, शिवसेना उप तालुकाप्रमुख मनोज पिंपळे, सचिन जमधडे, अमोल धनवटे, राहुल काजळे, ज्ञानेश्वर धनवटे, किरण गवते, अविनाश झिंजुर्डे, गजानन शिंदे, सचिन सूर्यवंशी, अमोल ठोकळ, ज्ञानेश्वर उगले, विशाल निरगुडे, शुभम वाघुडे, आकाश म्हस्के, गणेश जगताप, आर के भराड, योगेश चिमखडे, आप्पासाहेब शेवाळे, गौरव शिंदे, मनोज आकारगे, ऋषिकेश पाटील, सौरभ वाघुडे, सत्यम वाळुंज, राहुल सूर्यवंशी, अक्षय मोढेकर, प्रशांत जगताप, सौरभ मुंडलिक, मंगेश सोनवणे, विष्णुकांत शिंदे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
—————
