February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.16) – ग्रामपंचायत हद्दीतील झाडे सरपंच व ग्रामसेवक यांची परवानगी घेतल्या विना तोडल्याने वसु सायगाव येथील वृक्षप्रेमींनी वन अधिकारी वैजापूर व तहसीलदार गंगापूर यांच्याकडे धाव घेत कारवाई करण्याबाबत शुक्रवारी (ता.16) रोजी निवेदन दिले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय वैजापूर व तहसीलदार गंगापूर यांना सिताराम खंडू नरोडे रा. वसू-सायगांव ता. गंगापूर यांनी दिलेल्या लेखी निवेदनात असे म्हटले आहे की, मी वसू-सायगांव येथील रहिवासी असून ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 191 मधील काही मोठे झाडे बाबासाहेब रामनाथ ठोकळ रा. वसू सायगांव ता. गंगापूर यांनी कोणतीही परवानगी न घेता तोडले आहे. विशेष म्हणजे वन विभागाला दिलेल्या निवेदनासोबत ग्रामपंचायतीची परवानगी न घेतल्याचे पत्र सुध्दा नरोडे यांनी जोडले आहे. तसेच तोडलेल्या झाडासह ठोकळ याने त्याच्या घराजवळ असलेले ग्रामपंचायत हद्दीतील चिंचेचे झाड सुद्धा अर्धे तोडले आहे. वृक्षतोड करणारा हा एक आडदांड वृत्तीचा माणूस आहे. म्हणून त्याने ग्रामपंचायतीला सुद्धा विचारलेले नाही अथवा परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे या वृक्षतोडीची तात्काळ चौकशी करून योग्य कार्यवाही करावी. अशी विनंतीही सिताराम नरोडे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *