March 25, 2026

 

वाळूज महानगर (ता.8) – घरासमोरील ओट्यावर ठेवलेली पाण्याची विद्युत मोटर चोरायला आलेल्या दोन चोरट्यांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडून बेदम चोप दिला. आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ही थरारक घटना वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हर्सूली गावात 8 नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हर्सूली ता. गंगापूर येथील शेषराव त्रिंबक दुबिले (वय 55) यांच्या घरासमोरील ओट्यावरील ठेवलेली 10 एचपीची टेक्समो कंपनीची पाण्याची मोटार शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास आरोपी शुभम सुभाष आमराव (वय 19 वर्ष) व एक विधी संघर्ष बालक दोन्ही रा. लिंबेजळगाव ता. गंगापूर या दोघांनी चोरली. त्यानंतर दोघे दुचाकीवरून ती घेऊन जात असताना त्यांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर गावकऱ्यांनी आरोपींना चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील हिरो कंपनीची काळ्यारंगाची (विना नंबर प्लेट) स्प्लेंडर प्लस दुचाकी तसेच टेक्समो कंपनीची पाण्याची मोटार असा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

                 वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा –
या प्रकरणी शेषराव दुबिले यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम 322/2025 कलम- 303(2),3(5) बीएसएन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

         

               जमावाने दिला चोप –
आरोपींनी घरासमोरील विद्युत मोटर चोरून घेतली. आणि ती दुचाकीवरून घेऊन जात असताना गावकऱ्यांच्या नजरेत पडले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्यांना पकडून चांगलाच चोप दिला. यात तो जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *