March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) – रस्त्याने येणाऱ्या एका विद्यार्थ्याला दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी शिवीगाळ करून त्याच्या जवळील 18 हजार 499 रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला. भर दिवसा लुटमारीची घडलेली ही घटना सोमवारी (ता.13) रोजी दुपारी सिडको वाळूज महानगर-1 जवळ घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अजयकुमार गणपत शिंदे वय 18 वर्ष रा. बकवालनगर- नायगाव हा 11 वीत राजेशाहजी विद्यालय येथे शिकतो. तो सोमवारी (ता.13) रोजी दुपारी 3 वाजता ए एस. कल्बकडुन पंढरपुरकडे येत असतांना सिडको वाळुज महानगर -1 कमानी जवळ काळ्या रंगाची दुचाकी (एम एच 20, एफ के -5633) वर दोन जण आले व म्हणाले की, तु कुठला आहे? त्यांना वाळुज गावचा आहे. असे सांगितले असता त्यापैकी पाठीमागे बसलेल्याने शिवीगाळ करत हातातील विवो कंपनीचा व 18 हजार 499 रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावुन पळुन गेले. प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *