
वाळूजमहानगर, (ता.24) – भारताचा गौरव जगात वाढविण्यासाठी आजचा विद्यार्थी सु- संस्कृत होणे गरजेचे आहे. शाळा ही जी पवित्र जागा असते जेथे विद्यार्थी घडतो. शिक्षक हे या ओल्या मातीला आकार देत असतात, शिस्त लावत असतात. सीलबंद बाटलीत जेव्हा पिण्याचे शुध्द पाणी असते. त्यावेळी त्याचे मूल्य असते. बाटलीतून ते पाणी बाहेर आल्यावर त्याचे मुल्ये संपते. तसे हे शुद्ध पाणी रुपी विद्यार्थी जोपर्यंत शिस्तीत राहतील. तेव्हा त्याचे मूल्य असते. अशी अनेक सहज सोपी उदाहरणे देऊन श्री पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन माध्यमिक विद्या मंदिर ब बसवंतराव पाटील माध्यमिक इंग्लिश स्कूल, येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवारी (ता.23) रोजी करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून सलील पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासप्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव हरीश जाधव होते. ज्यामुळे तुम्हाला स्वतःला आनंद होईल, समाजाला, देशाला फायदा होईल. ते करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी निवडावे. सकारात्मक दुष्टीकोनातून, प्रगतीशील शेतकरी, आदर्श शिक्षक हे करिअर असू शकते. परीक्षा महत्त्वाचीच असते. पण केवळ 10 वी 12 वी नाही तर आयुष्यातील कोणतीही परीक्षा तयारीनिशी द्यायची असते. असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बी के शिरसाठ, प्रा. डॉ. महेश शिनगारे, मष्णाजी शिनगारे, मीरा देशपांडे, एच. बी. जाधव, रेखा बिदरकर, प्रा. संजय तुपे, नीलिमा रेळेकर, डी. यम. पठारे, दीपक कोळी, पूजा गिरी, प्रीती नरवाडे आदींनी परिश्रम घेतले.
