March 23, 2026

वाळूज महानगर (ता.8) – राहत्या घरी सिलिंगच्या हुकला दोरीच्या साह्याने एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी वाळूज परिसरातील विटावा येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रितम साईनाथ कर्डीले, (वय 19 वर्षे), रा. विटखेडा छत्रपती संभाजीनगर (ह.मु. विटावा शितलनगर वाळुज एम.आय.डी.सी.) याने स्वत:चे राहते घरी सिलिंगच्या हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेनंतर बेशुद्ध प्रीतम कर्डिले यास ऋषिकेश मुळे व बद्रीनाथ बोराडे यांनी घाटीत उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीतून पोलीस हवालदार एम.डी. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *