March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.23) – शेंदुरवादा महावितरण कार्यालयांतर्गत वीज जोडणीचे काम करणाऱ्या एका झिरो वायरमनला विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला. त्याला श्री नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवायकेतून उपचारार्थ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही घटना गुरुवारी (दि.22) रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास गुरुधानोरा येथे घडली.


याविषयी माहिती अशी की, शेंदुरवादा महावितरण अंतर्गत बाळू मल्हारी भावले (वय 35) हा झिरो वायरमन विद्युत डीपीवर काम करत होता होता. गुरुवारी दुपारी 2:30 वाजेच्या शॉक लागून तो बाजूला फेकला गेला. यात तो गंभीर जखमी झाला. ही माहिती नाणीज धाम संस्थानच्या श्री नरेंद्रचार्यजी महाराज रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिबंके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भावले यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *