
वाळुज महानगर, (ता.29)- वाळूज हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने वाढणारे शहर असून या भागातील रस्ते, आरोग्य, पाणी, वीज, शिक्षणासारखे मूलभूत प्रश्न मार्गी लागावेत अशी माझी प्रामाणिक भूमिका असून वाळूजच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू. असे प्रतिपादन आमदार सतीश चव्हाण यांनी वाळूज येथे 65 लक्ष रूपयांच्या विकास कामाचे लोकार्पण, भूमीपूजन प्रसंगी केले.
वाळूज येथील विविध वार्डामध्ये आमदार सतीश चव्हाण यांनी 65 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. यातील पूर्ण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण तर काही विकास कामांचे भूमीपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी आर बी मदरसा ते कबरस्थान पर्यंत सी सी रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, सर्जेराव भोंड ते सुनील शिंदे यांच्या घरापर्यंत सी सी रोड करण्यासाठी 10 लक्ष, साबळे वस्ती, येथील स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 15 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने ही कामे पूर्ण झाले.
या कामाचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तर पत्रा कॉलनी परिसरातील रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी 20 लक्ष, वॉर्ड क्र.1 येथील मस्जिद परिसरात सभागृह बांधकाम करण्यासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या कामाचे भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, वाळूजच्या भागातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी विधी मंडळात आवाज उठवला. यातील काही प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे
कार्यक्रमास गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, माजी जि.प.सदस्य मनोज जैस्वाल, सरपंच नासेर पटेल, जमिल शेख, लक्ष्मण पाठे, नदीम शेख, संजय काजळे, अमजद खान, मुकेश बोहरा, सर्जेराव भोंड, नंदू सोनवणे, अक्षय भवार, फय्याज कुरेशी, रियाज शेख, इर्शाद इनामदार, राहुल भालेराव, सुरेश केरे, आर.व्ही.दिवे, डॉ. रवींद्र शिरसाठ, रवी साळवे, कैलास साबळे, दयानंद साबळे, संजय भालेराव, विजू साबळे, नसीम हाफिज साहब, मुसा हाफिज साहब, अलीम सरोवर साहब, साईनाथ वाघचौरे, रोहित जाधव, अनिस शेख, मनोहर गवई, एकनाथ कुंजर आदींची उपस्थिती होती.
——————————————-
