
वाळूजमहानगर, (ता.23) – वाळूज येथे थोर समाजसुधारक, ग्रामस्वच्छता, लोकजागृती, अंधश्रध्दा निर्मूलनाचे व्रत हाती घेतलेले संत गाडगेबाबा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता.23) रोजी अभिवादन करण्यात आले.
येथील हिरा ड्रायक्लीनर्स येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, शिवसेना शहर प्रमुख अनिल सोनवणे यांनी निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी ज्ञानेश्वर शिंदे, विजय साबळे, कैलास पवार, राहुल राऊत, भिकंचंद देसाई, सुनिल सातपुतेआ दींसह नागरिकांची उपस्थिती होती.
