
वाळूज महानगर, (ता.10) – वाळूज येथे शिवसेनेच्या वतीने सिमेंट रस्ता, पेवर ब्लॉक, रस्ता मजबुतीकरण. अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते गुरूवारी (ता.7) रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कामांवर सुमारे 50 लाख रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. 
सकाळी 11 वाजता झालेल्या या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर, मार्केट कमिटीचे माजी सभापती लक्ष्मणभाऊ सांगळे, माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे, दिनेश मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रथम येथील जीवनलाल पाटणी प्रवेशद्वार द्वारासमोर ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजित विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे जल्लोष स्वागत करण्यात आले. त्यानंतर जीवनलाल पाटणी प्रवेशद्वार ते मुख्य गल्ली, मनिषानगर, अजवा नगर, शिवाजीनगर परिसरातील अविनाश काॅलनी येतील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमध्ये रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविणे, सिमेंट काँक्रिटीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. 
या कामांवर विरोधीपक्ष नेते दानवे यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या कार्यक्रमास गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिन काकडे, वाळूजचे उपसरपंच योगेश आरगडे, माजी सरपंच पपीन माने, ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, विभाग प्रमुख बाळासाहेब चनघटे, सुरेश केरे, संजय शिंदे, उत्तमराव बनकर, विश्वनाथ थोरात, बिट्टू जाधव, अनिल सोनवणे, श्रीराम बोचरे, बाबा कुटे, अमोल बोंद्रे, कैलास पवार, ज्ञानेश्वर देसाई, तुषार थोरात, यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
