वाळुज महानगर, (ता.22)- अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त वाळुज येथील कलानगर, शिवाजीनगर परिसर येथे श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह सायंकाळी 7.15 वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम सकाळी सात वाजता श्री गजानन महाराज मंदिरात ध्वज पूजन करण्यात येऊन नवीन झेंडे लावण्यात आले. त्यानंतर दुपारी अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन शुभ मुहूर्तावर वाळूज येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्री राम रक्षा स्त्रोत पठण होणार आहेत. तसेच सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर महाआरती होणार आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
