February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.30) – मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि त्यांच्या सूचनेचे पालन म्हणून मराठा आरक्षणासाठी वाळुज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवराय येथील राजन तावरे यांनी आमरण उपोषणास रविवारी (ता.29) रोजी पासून सुरुवात केली.

मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. सरकारने मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला पाठिंबा म्हणून वाळूज येथे गेल्या चार दिवसापासून सकल मराठा समाजाचे वतीने साखळी उपोषण सुरू होते.

उपोषणादरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवराई येथील राजन तावरे यांनी आपल्याकडील राजकीय पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन आमरण उपोषण सुरू केले आहे.

रविवारी (ता.29) पासून सुरू झालेल्या या उपोषणास वाळुज, लिंबे जळगाव पिंपरखेडा, शिवराई, रामराई, लांझी, मेहंदीपूर, नायगाव, बकवालनगर, शिवाजीनगर येथील नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *