वाळूज महानगर – वाळूज येथील सरस्वती विद्या विद्यालय व किड्स व्हॅली इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव वाघचौरे होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे हुसेन पठाण, मुख्याध्यापिका शारदा खोत, पालक प्रतिनिधी भाऊसाहेब लोणारी, योगेश कानडे, फेरोज पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण, गायन, नृत्य याद्वारे महाराष्ट्राचे व आपल्या विविध गुणांचे दर्शन घडविले. मान्यवरांनी भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुभाष उफाळकर यांनी, सूत्रसंचालन मनिषा खंडागळे तर नानासाहेब सुरवसे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
