गेल्या महीन्याभरापासून विविध गावात आरोग्य किर्तनातून ब्रेस्ट कॅन्सर याविषयी जनजागृती करणारे डॉ महादेव संकपाळ उर्फ बाबा हिन्दुस्तानी फुलम्बरीकर यांनी सोमवारी वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रात (phc) रुग्णाला व नातेवाईकामधे आरोग्य कीर्तनातुन या रोगा विषयी जनजागृती केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मेडिकल ऑफिसर प्रशांत दाते यांची उपस्थिति होती. तर उद्घाटक म्हणून गंगापुर पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योती गायकवाड़ होत्या.
प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.भार्गव मॅडम, पवार, अविनाश गायकवाड, डॉ योगेश बादले व परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी व आशा कार्यकर्ती हजर होते. यावेळी डॉ. संकपाळ यांनी ब्रेस्ट कॅन्सर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ.प्रशांत दाते यांनी रूग्ण व नातेवाईकाना
या रोगापासुन बचाव व उपचार याविषयी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज शिंदे व इतरानी परिश्रम घेतले.