वाळूजमहानगर (ता.16) :- मदर तेरेसा इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र मराठी शाळा वाळूज येथे “भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ यांच्या जयंती निमित्त “बालदिन” सोमवारी (ता.14) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष नबी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अफसर पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचाययत सदस्य तोफीक पटेल यांची उपस्थिती होती. प्रथम अध्यक्षांनी “पंडित जवाहरलाल नेहरू” यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून त्यांच्या जीवनचरित्र विषयी माहिती दिली. यावेळी शाळेतील शिक्षक रविंद्र उकिर्डे, इरफान शेख, अय्यब सय्यद, रफिक शेख, कणीस शेख, सीमा शेख, वैशाली गाडेकर, गणेश बनकर, दिनेश पालोदकर, बाळू पालवे, योगेश मोर्य, संतोष खरात, ताजोद्दीन शेख, किशन बारवाल, राहुल शेळके यांची उपस्थित होती.