March 28, 2026


वाळूज महानगर, (ता.20) – राहत्या घरी एका 42 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.20)रोजी सकाळी 6वाजेच्या सुमारास वाळूज येथे घडली. आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही.

चौका, ता.फुलंब्री येथील भाऊसाहेब दगडुजी वखरे हे पत्नी मंगल व दोन मुलांसह वाळूज येथील बजाज ट्रक टर्मिनल्सजवळ राहत होते. गुरुवारी (ता.20) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मंगल वखरे या पती भाऊसाहेब वखरे झोपलेल्या बेडरुममध्ये गेल्या असता त्यांना पती भाऊसाहेब हे छताच्या लोखंडी हुकला वायरच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला असता शेजारील नागरिकांनी धाव घेत भाऊसाहेब वखरे यांचा गळफास काढुन त्यांना खाली उतरविले. यानंतर ललीत राऊत व पोकॉ. एन.के.लघाने यांनी भाऊसाहेब वखरे यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब वखरे यांना मयत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.कारभारी देवरे हे करीत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *