February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.6) – खोटी फिर्याद दिल्याचा जाब विचारल्याने काळे व पवार कुटुंबीयात लाथा बुक्क्याने व दगडाने मारहाण झाली. यावेळी दोघांना काहीतरी औषध पाजल्याने त्यांना उपचारार्थ घाटीत दाखल केले असता एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सईदा भाभीच्या शेताजवळ रोडच्या कोपर्यावर शिवराई, वाळूज येथे सोमवारी (ता.5) रोजी 10 वाजता ही घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी पोपट नारायण पवार याचा मुलगा जॉन्सन पवार याने 14 महिन्यापूर्वी आरोपी रावसाहेब काळे याची मुलगी सीमा हिचे सोबत लग्न केले होते. तीन महिन्यानंतर इंदापूर येथे सीमा हिचा खून झाल्याने रावसाहेब काळे याने जॉन्सन व त्याचा भाऊ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. काळे व पवार यांनी आपसात समझोता करून केस मिटविण्यासाठी काळे याने पवार याचे शिवराई येथील घर जबरदस्तीने घेतलेले आहे. गेल्या शनिवारी रावसाहेब काळे याची पत्नी सुनंदा रावसाहेब काळे हिने पोपट पवार व त्याची पत्नी, मुलगा यांचे विरुद्ध मुलगा किडनॅप केल्याची केस केलेली आहे.
सोमवारी (ता.5) रोजी 10 वाजेच्या सुमारास रावसाहेब काळे याचा किडन्याप झालेला मुलगा हा सईदा भाभीच्या मळ्यात आल्या बाबत माहिती मिळाल्याने तेथे पवार, त्याची पत्नी व मेव्हणा रमेश बबन काळे असे गेले असता तेथे आरोपी बसलेले होते. त्यांचे सोबत किडनॅप झालेला मुलगा तेजवील हा देखील असल्याने फिर्यादीने आरोपी शिवा काळे यास तेजवील तर येथेच आहे. मग खोटी केस का केली? असे विचारले असता त्यावेळेस तेजवील तेथून पळून गेला. व आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमून फिर्यादी, त्याची पत्नी व मेव्हणा रमेश काळे यांना खाली पाडून दगडाने लाथा बुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीच्या पत्नीस डोक्यास मार लागल्याने ती तेथून पळून गेली. आरोपींनी फिर्यादी व रमेश काळे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना धरुन काहीतरी औषध पाजून तेथून पळून गेले. त्यानंतर तेथे फिर्यादीची पत्नी अश्विनी हिने रिक्षा आणून त्यामध्ये फिर्यादी व रमेश काळे यांना उपचार कामी घाटीत येथे दाखल केले असता उपचार चालू असताना रमेश बबन काळे हा मरण पावला.
याप्रकरणी पोपट नारायण पवार, वय 40, रा. नवीन शिवराई, वाळूज याच्या फिर्यादीवरून आरोपी रावसाहेब सिताराम काळे, शिवा सिताराम काळे, राजवील ऊर्फ बुटेल रावसाहेब काळे, सुनंदा रावसाहेब काळे, अनिल शैनाज पवार सर्व रा. वाळूज यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *