श्रद्धा सुवर्ण गणेश मित्र मंडळ, श्रद्धा कॉलनी, शिवाजीनगर वाळूज यांच्या वतीने मंगळवारी (ता.6) रोजी आयोजित
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात गणेश भक्तांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

या शिबिरात डॉक्टर योगिता मोरे यांनी व त्यांच्या पथकाने
मोफत Covid -19 बूस्टर डोस, फुल बॉडी चेकअप, एचआयव्ही टेस्ट आधीच विविध आजाराची तपासणी करून आरोग्य विषयक सल्ला दिला.
या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, डॉ. योगिता मोरे, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, सचिन काकडे, गणेश तुपे, सचिदानंद जाधव, लक्ष्मण मशरुप, संतोष धतुरे, संभाजी बोरुडे, भगवान चिखले, योगेश गलांडे, सागर जगदाळे, भाऊसाहेब जीवरक, लक्ष्मण पवार, नामदेव इले, अमोल पुंड आदींची उपस्थिती होती.
