March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 6) – स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक, पद्मविभूषण, टेम्पल्टन आणि अनेक पुरस्काराने सन्मानित प. पू.पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या कन्या धनश्री दीदी तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाध्याय परिवाराच्या वतीने छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यातील स्वाध्याय परिवारातर्फे रक्षाबंधन उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

शनिवारी 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता बजाजनगर सिडको महानगर येथील पाण्याच्या टाकीजवळील मैदानावर लाखो स्वाध्यायींच्या साक्षीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच धनश्री दीदींचे मंगल प्रवचन होणार आहे. विश्वश्रेष्ठ अशा भारतीय संस्कृतीतील विविध ऊत्सवापैकी एक तसेच मानवी संबंधात दृढता आणणाऱ्या रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) हा बहुविध पैलू असणारा हा एक पवित्र ऊत्सव आहे.
महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पवित्र बनविण्याचा आणि भावा बहिणीच्या अतूट नात्याचा संदेश देणारा हा ऊत्सव म्हणजेच आपल्या संस्कृतीचे एक सोनेरी पान आहे. प.पू. पांडुरंग शास्त्री यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनभर दैवी भार्तृभावाच्या नात्याने एक वैश्विक असा स्वाध्याय परिवार उभा करून बंधू भगिनींच्या या पवित्र नात्याला वैश्विक बनवून रक्षाबंधन या ऊत्सवाचा महीमा आणि गौरव वाढवला. दादांच्या या वैश्विक कार्याची धूरा त्यांच्या कन्या धनश्री दीदी तळवलकर अखिल स्वाध्याय परिवाराची मोठी बहीण म्हणून अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत..

स्वाध्याय परिवाराकडून दीदींना मानवंदना-
या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून हजारो स्वाध्यायी युवक- युवती एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे दीदींना मानवंदना देणार आहे. या ऊत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजेच दीदींचे याप्रसंगी मंगल प्रवचन होणार आहे. विशेष म्हणजे दादांच्या ह्रदयस्त भगवंत आणि दैवी भातृभावाचा विचार भक्तीफेरीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन देऊन हा ऊत्सव स्वाध्याय परिवार साजरा करत आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वाध्याय परिवाराने केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *