वाळूजमहानगर, (ता.23) – तिसगाव परिसरातील सिडको वाळूजमहानगर-1, राजस्वप्नपूर्ती सोसायटीत महाशिवरात्र निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री शिव महापुराण कथा ची सुरूवात करण्यात आली. या सप्ताहचे ध्वजपुजन सामाजिक कार्यकर्ते तथा तिसगावचे माजी उपसरपंच नागेश कुठारे यांच्या करण्यात आले.
गुरुवारी (ता.20) पासून सुरू झालेल्या या सप्ताहमध्ये हभप प्रथमेश महाराज करपे यांची संगीतमय श्री शिव महापुराण कथा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरी जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमासह कोमल दीदी कुऱ्हाडे, संतोष महाराज गोरे, वैष्णवी जाधव यांचे कीर्तन होणार आहे. तसेच गुरुवारी (ता.27) रोजी रामायणाचार्य हभप संजय महाराज कुऱ्हाडे यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सुशांत चौधरी, अनिल मालवदे, संदीप म्हस्के, काळूदास भगरे, सतीश शिंदे, सुशील कतारे, संजय तांगडे, किशोर लिंबे, काकासाहेब लांडगे, दीपक भुतेकर, दत्ता चव्हाण, संदीप रोडे, मनीषा चव्हाण, प्रमिला, चौधरी, जानवी कर्पे, स्वप्ननाली मालवदे, प्रमिला चौधरी, अर्चना चौधरी, कामिनी सातपुते, मंगल शिंदे आदी परीश्रम घेत आहे.