March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.7) – माहेश्वरी समाज बजाजनगर, वाळुज प्रभागाच्या वतीने सिडको वाळूज महानगर – 1 येथे ‘हरीयाली तीज’ चा कार्यक्रम बुधवारी 6 ऑगस्ट रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

सनातन हिंदू धर्मात तीज या सणाला विशेष महत्व आहे. विवाहीत स्त्रीया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तर अविवाहीत मुली इच्छित वरासाठी हे व्रत करतात. हे व्रत शिव-पार्वतीचे पुनर्मिलन स्मृतीचे व्रत आहे. याच दिवशी पार्वतीने कठोर तपस्या करून शिवाला प्राप्त केले होते. याचेच प्रतीक म्हणून माहेश्वरी समाज बजाजनगर, वाळूज प्रभागाद्वारे हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सर्व माहेश्वरी भगीनिंनी सहभाग घेत विविध खेळ, गाणे, नृत्य करून कार्यक्रमात आनंद साजरा केला गेला.
याप्रसंगी विजया काबरा, उमा भन्साळी, लीलाबाई मिणीयार, दुर्गा बहादुपोता आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौरी मिणियार यांनी केले.
श्रध्दा बहादुरपोता, कामिनी मिणीयार, डॉ. वैशाली तोतला, बबिता शर्मा, ज्योती भंडारी, विद्या सारडा यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *