वाळूजमहानगर, (ता.7) – वाळूज महानगर येथे वाळूज महानगर युवा पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.6) रोजी दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी साप्ताहिक लोकाश्रयचे संपादक शिवाजी दादा बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगापूर खुलताबाद तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र टाईमचे पत्रकार किशोर बोचरे,दै. सकाळचे बातमीदार आर के भराड, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व दैनिक पुण्यानगरीचे ब्युरोचीफ संदीप चिखले, सचिव व न्यूज मराठवाडा चॅनेलचे संपादक संदीप लोखंडे, लोकमतचे पत्रकार महेमूद शेख, एमसीएन न्यूज चॅनेलचे पत्रकार अशोक साठे, पुण्यानगरीचे पत्रकार राहुल मुळे, स्टेट महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे पत्रकार गजानन राऊत, सा. लोकाश्रय कुमार भोजणे, आर आर कुसळकर, के पी चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
