वाळूजमहानगर, (ता.19) – वाळूज महानगर पत्रकार संघाची निवडणूक संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.18) रोजी घेण्यात आली. गुप्त पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत संघाच्या अध्यक्षपदी अशोक कांबळे तर सचिवपदी संदीप लोखंडे यांनी बहुमताने विजय मिळवला. त्यामुळे त्यांची निवड झाल्याचे मावळते अध्यक्ष रामराव भराड यांनी जाहीर केले.

वाळूज महानगर पत्रकार संघाची बैठक येथील वैष्णौदेवी उद्यान येथे बुधवारी (ता.18) झाली. प्रथम वाळूज महानगर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली.
विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आल्यानंतर पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड सर्वांनुमते गुप्त पद्धतीने घेण्यात आली. यात पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी –

अशोक कांबळे, उपाध्यक्ष- चंद्रकांत चाबुकस्वार, सचिव- संदीप लोखंडे, सहसचिव – अशोक साठे, कोषाध्यक्ष – माधव घोरबांड, कार्याध्यक्ष – संजय मगरे, यांची तर सल्लागार म्हणून- चंद्रशेखर कुरणे, महेमूद शेख,
देविदास त्रिंबके, रामराव भराड, श्यामसुंदर गायकवाड, भागीनाथ जाधव, संतोष उगले, किशोर बोचरे, शिवाजीराव बोडखे यांची निवड करण्यात आली.
बैठकीला संतोष बारगळ, संदीप चिखले, संतोष बोटवे, भारत थटवले, संजय काळे, अनिकेत घोडके, निलेश भारती, गजानन राऊत, राहुल मुळे, राजू जंगले, डी पी वाघ, अभिजीत चौरे आदींची उपस्थिती होती.
—————
