March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.5) – कायदा व सुव्यवस्थेचा सुगम संगम बांधत पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यांवर प्रतिबंध मिळवत तसेच दोशींवर व कठोर कारवाई करून गुन्ह्याचा आलेख कमी केल्याने सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून वाळूज पोलिस ठाण्याची निवड करण्यात आली. देशात पहिल्या दहात तर राज्यातून पहिल्या पाचमध्ये तिसरा येण्याचा मान वाळूजला मिळाला आहे. या पुरस्कारांची घोषणा राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाच्यावतीने नुकतीच करण्यात आली.

देशात व राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या वतीने सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यात निकोप स्पर्धा वाढावी, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंधक, दोषसिद्धी यांमध्ये सुधारणा व्हावी, या उद्देशाने देशपातळीवर दहा सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्याची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे या पुरस्कारांची निवड गृहमंत्रालयाकडून केली जाते. स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस ठाण्यांचा विचार करून सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्याच्या निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला. त्यातून पोलिस ठाण्यांची कार्यक्षमता व कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी करणे, गुन्हेगारीला प्रतिबंधक करणे, गुन्ह्यांचा तपास तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत 2020 या वर्षांपासून राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच पोलिस ठाण्यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

          कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी
या निर्णयानुसार सलग दुसऱ्यांदा वाळूज पोलिस ठाण्याने सर्वोत्कृष्ट – 2021 या वर्षाचा पुरस्कार मिळवला आहे. सन्मानचिन्ह व रोख बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2021 मध्ये वाळूज पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप गुरमे व नंतर पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्याकडे होता. या काळात पोलीस निरीक्षक गुरमे व इंगोले यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पोलीस ठाण्याचा उच्चांक गाठला. त्यामुळे वाळूज पोलीस ठाण्याला दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची घोषणा राज्याचे पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी केली.

           अभिनंदनीय अधिकाऱ्यांचे स्वागत
वाळुज पोलीस ठाण्याला सलग दुसऱ्या वर्षीही राज्यात प्रथमतेचा मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे वाळूज पोलीस ठाण्याचे तत्कालीन कर्तव्यदक्ष अधिकारी व त्यांचे कर्मचारी या सर्वांचे परिसरातून स्वागत होत आहे. तसेच पुढील काळातही पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या टीमने असेच उत्कृष्ट कार्य करून वाळूज पोलीस ठाण्याचे नाव लौकिक करावे. अशी अपेक्षा पोलीस आयुक्तांसह वाळूज परिसरातील नागरिकांना आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *