March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.2) – मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची वाळूज
परिसरात विशाल जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेसाठी सिडको वाळुजमहानगर पाण्याच्या टाकी जवळील बत्तीस जागा निश्चित करण्यात असली तरी येणारी गर्दी लक्षात घेऊन करोडी जवळील शंभर एकर जागेचाही विचार होत आहे. या सभेच्या पूर्व नियोजनासाठी बजाजनगर येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक शुक्रवारी (ता.1) रोजी सायंकाळी 6 वाजता घेण्यात आली.
ही सभा ऐतिहासिक व गर्दीचा विक्रम मोडणारी कशी ठरेल, यासंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर मराठा योद्धा जरांगे पाटील घेऊन आले आहे. त्यांनी सरकारला सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. याकरिता 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. वाळूज महानगरातील सभा ही अंतिम टप्प्यातील असल्यामुळे ही सभा सर्व सभेचे उच्चांक मोडून शासनाला मराठा समाजाचा धाक निर्माण करणारी असेल. असा निर्धार या बैठकीमध्ये समाज बांधवांनी एकमताने केला. सभेसाठी प्राथमिक स्वरूपात सिडको वाळूज महानगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळील 32 एकर जागेवर एकमत झाले असले तरी सभेच्या आठ दिवस अगोदर नागरिकांचा प्रतिसाद पाहून मुंबई नागपूर हायवे वरील करोडी गट नंबर मधील शंभर एकर वर सभा घेण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच मंडप, पार्किंग, सुरक्षा, महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, सभेला उपस्थित राहणाऱ्या समाज बांधवांसाठी चहापान, स्वागत रॅली, स्वयंसेवक आदी विषयावर सखोल चर्चा करण्यात येऊन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या सभेचे गावोगावी जाऊन निमंत्रण देण्यासाठी सर्कलनिहाय मराठा सेवक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये वाळूज परीरातील बजाजनगर, रांजणगाव (शेणपुंजी), वाळूज, घाणेगाव, पाटोदा, गंगापूर (नेहरी), वळदगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, बकवालनगर, विटावा, करोडी, साजापूर, शरणापुर, तिसगाव, धरमपूर, गोलवाडी, आंबेगाव, एकलहरा नांदेड कासोडा, वंजारवाडी, वजनापूर, लासुर, दिवशी पिंपळगाव येथील सकल मराठा समाज चळवळीतील मराठा सेवक बैठकीत सहभागी झाले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *