March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – त्यागमूर्ती राष्ट्रमाता रमाई आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त वाळूज परिसरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रमाता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आनंद बुद्ध विहार वडगाव (को.) –
येथे सकाळच्या सत्रात रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने बँड, ढोल या वाद्यामध्ये मानवंदना देण्यात आली. विलास पठारे, देवानंद सावंत, नामदेव गायकवाड, नामदेव केदारे, महिला सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. यावेळी विजय गायकवाड, सतीश साळवे, गौतम पाईकराव, शंकर खरात, अण्णा जाधव, रामनाथ परकारे, रमेश दाभाडे, आसाराम वाहुळ, मगन निकम, गजाजन कटारे, रवी भालेराव, दिपाली परकारे, सुनंदा कसबे, सुनील होर्शिळ, सिद्धार्थ राऊत, कौशल्याबाई निकम, विमलबाई दळवी, द्वारकाबाई नरवडे उपस्थित होते. यावेळी रमाईच्या जीवनावर आधारित गीते सादर केली. यावेळी दिपक निकम, विशाल रुपेकर, अजय जाधव, सागर खिल्लारे, शुभम परकारे, रमेश जोगदंडे यांच्यासह प्रमुख पाहुणे प्रवीण नितनवरे, अंजन साळवे, अशोक वाहुळ, ज्ञानेश्वर जाधव, जे के अमराव, सूर्यकांत पठारे, विनोद वाकोडे, राहुल कानडे, गौतम गायकवाड यांची उपस्थिती होती. आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी उपस्थिताचे स्वागत करून आभार मानले.

बोधिसत्व ध्यानसाधना केंद्र –
तिसगाव येथे माता रमाई यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितंच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी बोधिसत्व ध्यानसाधना केंद्राचे अध्यक्ष अंजन साळवे, प्रवीण नितनवरे, आनंद बुध्द विहारचे अध्यक्ष प्रकाश निकम, कौशल्य बुध्द विहारचे अध्यक्ष रमेश जोगदंडे, सुधीर शेषवरे, काकासाहेब गायकवाड, विनोद वाकोडे, अस्लम शेख, सतीश महापुरे, अशोक वाहुळ, अभिषेक दाभाडे,आशाबाई शिराळे, सुनंदा त्रिभुवन, नंदा मोगले, त्रिषाला गाथाडे आदींची उपस्थिती होती.
कौशल्य बुध्द विहार –
वडगाव गट नंबरच्या वतीने वाहन रॅली काढण्यात आली. ही रॅली क्रांतीनगर, म्हाडा कॉलनी तिसगाव, पंढरपूर, महाराणा प्रताप चौक,आम्रपाली बुध्द विहार, वडगाव, बजाजनगर, सिडको मार्गे बोधिसत्व ध्यानसाधना केंद्रात समारोप करण्यात आला. रमेश जोगदंडे, सुखदेव सोनवणे, श्रीमंत सोनवणे, ज्ञानशील वाघमारे, गौतम गायकवाड, गणेश गाडेकर, अनिल थोरात, रामदास बर्फ, बालाजी साखरे आदींची उपस्थिती होती.
   श्रावस्ती बुद्ध विहार

रांजणगाव शेणपुंजी येथे माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुजन शिवराम ठोंबरे, मोहिनी बडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महिलांना मोहिनी बडे यांनी मार्रदरर्शन केले. छाया मनोहर, शालीनी वाकोडे, आशा गायकवाड, माया तुपे, पंचशीला मनोरे, शारदा भालेराव, मंदाकिनी बनसोडे, रेखा सदार, कवीता गवळी, मिनाक्षी बडे, आशा गायकवाड, कविता गवई आदींसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *