March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.29) – वाळूज औद्योगिक परिसरातील इंडिको रेमेडीज लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली. या आगीमध्ये कोट्यावधीचे नुकसान झाल्याचा अंदाज असून ही आग शनिवारी (ता.29) रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास पॅकिंग डिपार्टमेंटला लागल्याची माहिती मिळते. अग्निशमन दलाचे 4 बंब रात्रीपासूनच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा करीत आहेत.

या आगीबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील बी सेक्टर मध्ये प्लॉट नंबर 20 येथे इंडिगो रेमेडिज लिमिटेड ही औषधी बनवणारी कंपनी आहे. शनिवारी (ता.29) रोजी मध्यरात्री 12 वाजेनंतर या कंपनीच्या पॅकिंग विभागाला आग लागली. पाहता पाहता ही आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने या आगीची माहिती वाळूज अग्निशमन दलास देण्यात आली.

कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच वाळुज अग्निशमन दलाचे अधिकारी आर एच गरद, के के सूर्यवंशी, एस बी शेंडगे, ए एम हातोटे, एस डी उपरेपाटील, एन एस पारखे यांच्यासह दोन बंब घटनास्थळी पोहोचले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने बजाज, गरवारे आणि शेंद्रा एमआयडीसीतून बंबासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यास पाचारण करण्यात आले.

ही आग विझवण्यासाठी वाळूज एमआयडीसीचे दोन बंब, बजाज कंपनीचा एक व गरवारे कंपनीचा एक असे चार बंब शर्तीचे प्रयत्न करताना दिसून आले. या आगीत कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागण्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *