वाळुज महानगर, (ता.25)- थर्टी फर्स्ट, नववर्ष व मराठा आरक्षण आंदोलन या पार्श्वभूमीवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने वाळूज परिसरात सोमवारी (ता.25) रोजी पथसंचलन करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या या पथसंचलनात विविध पोलीस ताब्याच्या वाहनांसह हत्यारबंद अधिकारी, अंमलदार अशा एकूण 106 जणांचा समावेश होता.
सकाळी 11.30 वाजता वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे येथून सुरू झालेले हे पथसंचलन मोरे चौक, मोहटादेवी चौक, छत्रपतीनगर, वडगांव (को.) आण्णाभाऊ साठे चौक, जयभवानी चौक, रांजणगांव फाटा, एनआरबी चौक, दत्तनगर फाटा, बाळकृष्ण पेट्रोलपंप, रांजण गांव (शे.पु.), कमळापूर फाटा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. व परत रांजणगांव फाटा, कोलगेट चौक, महाराणाप्रताप चौक, बजाजनगर मार्गे पोलीस ठाणे या मार्गाने करण्यात आले.
पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, यांच्या आदेशाने वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोउपनि. संदिप शिंदे, राहूल निर्वळ, शिवाजी घोरपडे, दिपक रोठे, प्रविण पाथरकर, मपोउपनि. स्वाती उचित, पोउपनि धनराज राठोड, प्रभाकर जायभाय यांच्यासह वाळुज एमआयडीसी ठाण्याचे 9 अधिकारी, 40 अंमलदार, 6 महिला अंमलदार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलचे 3 अधिकारी, 48 अंमलदार असे एकूण 106 अधिकारी अंमलदार आदींनी सहभाग घेतला.
