
वाळूजमहानगर, (ता.26) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टरमधील एका कंपनीत विना परवाना व बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आल्याचे गुरुवारी (ता.25) रोजी सकाळी उघडकीस आले. या प्रकारामुळे वाळूज परिसरातील वृक्षप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.आली.
वाळुज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर मधील कंपनीच्या आवारात सागवानी सह इतर झाडे लावण्यात आली आहे. कंपनीच्या प्रवेशाद्वारासमोर पूर्ण वाढ झालेली 8 ते 10 झाडे कटर मशिनच्या सहाय्याने तोडण्यात आली. त्यातील काही बुंध्यापासून तर काही झाडांची फांद्या कट करण्यात आल्या आहे. त्याची लाकडे व झाडांच्या तोडलेल्या फांद्या कंपनीच्या आवारात ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासन लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड करीत आहे. तर दुसरीकडे वृक्षतोड होत असल्याने पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
