
वाळुज महानगर – श्री साईनाथ विद्यालय वाळूज येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वंदना बेडसे होत्या. तर प्रमुख पाहून म्हणून वाळूज एमआयडीसीतील उदोगजक भास्करराव पालवे, कारभारी दराडे उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी उद्योजक भास्करराव पाले, कारभारी दराडे व शाळेतील शिक्षक कारभारी जाधव यांनी गरीब विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एच गुरुनानकर यांनी, सूत्रसंचालन कुमारी आकांक्षा साळुंकेने तर आभार चिरंजीव पृथ्वीराज गोर्डे याने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. अध्यक्षय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
